Rajapur मधील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा

302
Rajapur मधील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा
Rajapur मधील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा

राजापूर (Rajapur) तालुक्यातील रायपाटण (Raipatan) येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या (Manohar Hari Khapane College) राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा येथील तीन ते चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यातून, या शिवकालीन पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदीर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. या विद्यार्थ्यांच्या कामामुळे शिवकालीन इतिहास आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

( हेही वाचा : मुंबई हल्ल्याचा आरोपी Abdul Rehman Makki याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

येरडव ते अणुस्कुरा शिवकाळामध्ये रहदारी असलेली पायवाट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) कोकणामध्ये आल्याचे सांगते. तसेच छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) पकडण्यासाठी आलेले मुघली सैन्यही याच पायवाटेने कोकणात आल्याचे सांगितले जाते. या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूकही झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. एकंदरित छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शिवकालीन ऐतिहासिक ठेवा पाहता येणार आहे. त्यामुळे भविष्यात इतिहास अभ्यासक, पर्यटक, ट्रेकर्स या वाटेकडे वळतील, हे निश्चित. दरम्यान या पायवाटेचे ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी शासनाने आता पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.