Ratnagiri : समुद्राच्या लाटांमुळे गणपतीपुळे मंदिराच्या संरक्षक भिंतीची पडझड

237
Ratnagiri : समुद्राच्या लाटांमुळे गणपतीपुळे मंदिराच्या संरक्षक भिंतीची पडझड

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे समुद्री लाटाही मोठ्या प्रमाणात उसळत आहेत. मोठ्या लाटांच्या तडाख्यामुळे गणपतीपुळे येथील मंदिरानजिकच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. (Ratnagiri)

अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकत असल्यामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या किनाऱ्यावर तसेच गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिर आवारातही लाटांचा तडाखा बसू लागला आहे. मोठ्या लाटांमुळे मंदिरानजीक पर्यटकांसाठी उभारलेली संरक्षण भिंतवजा प्रेक्षक सज्जाची पडझड झाली आहे. (Ratnagiri)

(हेही वाचा – कांदा, कापूस, सोयाबीन दराचा प्रश्न अखेर मार्गी लागणार; Piyush Goyal यांची पाशा पटेल यांना ग्वाही)

या पायऱ्यांवर बसून पर्यटक गणपतीपुळे येथील समुद्राच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असतात. मंदिराजवळ संरक्षक भिंतीची नासधूस झाल्यामुळे तातडीने उपाययोजना हाती घ्यावी लागणार आहे. अन्यथा लाटांचा तडाखा आणखी आतापर्यंत बसण्याची शक्यता आहे. (Ratnagiri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.