कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघ कुणाकडे जाणार यापासून सुरु झालेल्या चर्चेनंतर कुणाला उमेदवारी मिळणार, केंद्रीय मंत्री नारायण राणे की उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळणार यापर्यंत सुरु असलेल्या चर्चेवर अखेर पूर्णविराम देण्यात आला. त्यामुळे अपेक्षितपणे नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले शुक्रवारी मोठे शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, नारायण राणे हे प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असून यापूर्वी दादांचा पराभव केल्यामुळे कोकणातील जनतेला आता त्याचे दु:ख वाटू लागले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या दादांच्या पराभवाचे प्रायश्चित करून त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यासाठी कोकणातील जनतेने निर्धार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वत: राणे निवडणूक रिंगणात उतरल्याने विनायक राऊतांच्या उरात धडकी भरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (Ratnagiri-Sindhudurg)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सुजय विखे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून BJP नाराज; निवडणुकीत बसू शकतो फटका)
राणे यांच्यासाठी पुरक वातावरण
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सन २००९च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निलेश नारायण राणे विजयी झाले होते. निलेश राणे यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. निलेश राणे (Narayan Rane) यांनी त्यावेळी ३ लाख ५३ हजार ९१५ मते मिळवली होती तर प्रभू यांना ३ लाख ०७ हजार १६५ मते मिळाली होती. त्यानंतर सन २०१४च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत हे निवडणूक रिंगणात हे उभे राहिले आणि मोदी लाटेवर राऊत हे निवडून आले होते. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीतही भाजपा सोबतच्या युतीच्या जोरावर मोदी लाटेवर निवडून आले. परंतु सन २०१४मध्ये निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकीटावर आणि सन २०१९मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु मोदी लाटेमुळे निलेश राणे यांचा पराभव झाला असला तरी या लाटेतही निलेश राणे यांनी ३ लाख ४३ हजार मते मिळवली होती आणि शिवसेना भाजपा युती तसेच काँग्रेसचा उमेदवार समोर उभा ठाकल्यानंतरही निलेश राणे यांनी २ लाख ७९ हजार ७०० मते मिळवली होती. (Ratnagiri-Sindhudurg)
त्यामुळे या मतदार संघात राणे यांची निव्व्ळ अडीच लाखांहून अधिक मते असून यंदा स्वत: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे निवडणूक रिंगणात उतरले आहे. आजवर केवळ शिवसेना आणि काँग्रेस तिकीटावर उभे राहणारे नारायण राणे हे प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. भाजपाचे उमेदवार असल्याने तसेच कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने राणे यांच्यासाठी आता पुरक वातावरण आहे. राणे यांची हक्काची सुमारे अडीच हजार मते असून त्यातच भाजपा तसेच शिवसेनेची साथ मिळाल्याने विनायक राऊत यांच्या पेक्षा राणे यांचे पारडे अधिक जड झाल्याचे पहायला मिळत आहे. (Ratnagiri-Sindhudurg)
(हेही वाचा – Navneet Rana: “सीतेला पण भोग चुकले नाही, आपण तर..” राऊतांच्या टीकेवर नवनीत राणांचा घणाघात)
नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे (Narayan Rane) हे २००९मध्ये कुडाळ विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. राणे यांनी शिवसेनेचे वैभव नाईक यांचा पराभव केला होता. परंतु सन २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणे यांचा पराभव शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी केला होता. राणे यांना ६० हजार २०६ मतदान झाले तर वैभव नाईक ७० हजार ५८१ मतदान झाले होते. त्यामुळे दहा हजार मतांनी नाईक यांनी राणे यांचा पराभव केला होता. तर सन २०१९मध्ये नारायण राणे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्धार केला आणि त्यांनी रणजित देसाई यांना अपक्ष उमेदवार उभे केले. परंतु या निवडणुकीत वैभव नाईक यांना ६९ हजार मते तर रणजित देसाई यांना ५४ हजार ८१९ मते पडली होती. त्यामुळे राणेंनी साथ दिल्यानंतरही अपक्ष उमेदवाराला सुमारे ५५ हजारांचे मतदान त्यांच्या पारड्यात पडल्याने राणे यांची कोकणात चांगल्याप्रकारे आजही पकड असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत राणे जर निवडणूक रिंगणात उतरले असते वैभव नाईक यांचा पराभव शक्य होता आणि मोठ्या फरकाने राणे विजयी झाले असते असे कोकणातील जनतेचे म्हणणे आहे. (Ratnagiri-Sindhudurg)
मात्र, आता नारायण राणे (Narayan Rane) स्वत: निवडणूक रिंगणात उतरल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढलेला असून राजापूर व कुडाळ मतदार संघ वगळता उर्वरीत सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाचे पारडे जड असून कुडाळ आणि कणकवलीमधून राणे यांना सर्वाधिक मतदान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राणे यांचा २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा खुद्द मतदारच काढतील असे कोकणी जनतेची धारणा आहे. (Ratnagiri-Sindhudurg)
सन २००९ची लोकसभा निवडणूक निकाल
निलेश राणे (काँग्रेस पक्ष) ३ लाख ५३ हजार ९१५ मते
सुरेश प्रभू (शिवसेना) ३ लाख ०७ हजार १६५ मते (Ratnagiri-Sindhudurg)
सन २०१४ची लोकसभा निवडणूक निकाल
विनायक राऊत (शिवसेना) ४ लाख ९३ हजार ०८८ मते
निलेश नारायण राणे (काँग्रेस) ३ लाख ४३ हजार ०३७ मते (Ratnagiri-Sindhudurg)
सन २०१९ची लोकसभा निवडणूक निकाल
विनायक राऊत (शिवसेना) ४ लाख ५८ हजार ०२२ मते
निलेश नारायण राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) २ लाख ७९ हजार ७०० मते
नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस पक्ष) ६३ हजार २९९ (Ratnagiri-Sindhudurg)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community