गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठ्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरात दर सोमवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच १ मार्च २०२३ रोजी शीळ धरणात १.९५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. यावर्षी १ मार्च २०२४ रोजी १.८२८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा राहिला आहे. सध्या ४९ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनापर्यंत रत्नागिरी शहरात दर सोमवारी आणि दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील.
(हेही वाचा – Amit Shah : महाराष्ट्र ५० वर्षांपासून शरद पवारांचं ओझं वाहतोय; अमित शाह यांची महाविकास आघाडीवर सडकून टीका )
रत्नागिरी शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community