दहिसरमधील (Dahisar) झेप्टोच्या (Zepto) गोडाऊनवर मनसेने (MNS) धडक दिली होती. झेप्टोच्या गोदामात उंदीर, झूरळे सापडल्याचा दावा मनसेने केला. या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले. या आंदोलनकर्त्या मनसैनिकांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – नांदेड अपघातग्रस्ताला CM Devendra Fadnavis यांची मदत ; घेतली शिक्षणाची जबाबदारी)
झेप्टोमध्ये आमचे पदाधिकारी कामगारांच्या काही प्रश्नांसाठी गेले होते. झेप्टो कशा घाणेरड्या पद्धतीने त्यांचे गोडाऊन ठेवते, हे दाखवणे गुन्हा आहे का ? खंडणी मागायला कोणी मिडिया घेऊन जातात का ? मनसैनिकावर खंडणीखोरीचा गुन्हा दाखल करणे, हा झेप्टोचा खोटारडेपणा आहे. झेप्टोला आम्ही मनसेस्टाईल उत्तर देणार. झेप्टोला फिरू देणार नाही, असा इशारा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांचा यासंदर्भातील व्हिडिओही व्हायरल होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community