Ravindra Jadeja Retirement: रोहित, विराटनंतर रविंद्र जडेजानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती

139
Ravindra Jadeja Retirement: रोहित, विराटनंतर रविंद्र जडेजानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती
Ravindra Jadeja Retirement: रोहित, विराटनंतर रविंद्र जडेजानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती

टीम इंडियाने २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने १७७ धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ८ बाद १६९ धावांवर रोखलं. टीम इंडियाने अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या अविस्मरणीय विजयानंतर विराट कोहली आणि त्याच्या पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही टी-२०  क्रिकेटला रामराम केला आहे. रवींद्र जडेजाने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Ravindra Jadeja Retirement)

जडेजाने सोशल मीडिया पोस्ट मध्ये काय म्हटलं?

रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup) ट्रॉफीसह फोटो पोस्ट केला आहे. जडेजाने या पोस्टमध्ये भरभरुन लिहिलंय. “मनपूर्वक आभार, मी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतोय. मी नेहमीच अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे देशासाठी 100 टक्के देत राहिन. तसेच मी इतर फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. टी-२० वर्ल्ड कप जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. अविस्मरणीय आठवणी, उत्साह आणि बिनशर्थ पाठिंब्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद “, असं जडेजाने इस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं. (Ravindra Jadeja Retirement)

WhatsApp Image 2024 06 30 at 7.07.45 PM

रवींद्र जडेजा याची टी-२० कारकीर्द

रवींद्र जडेजाने १० फेब्रुवारी २००९ साली श्रीलंकेविरुद्ध टी-२० पदार्पण केलं होतं. जडेजाने तिथपासून ते आता टी-२० वर्ल्ड कप फायनल २०२४ पर्यंत एकूण ७४ सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. जडेजाने या ७४ सामन्यांमधील ४१ डावात बॅटिंग करताना ५१५ धावा केल्या. तर ७१ डावात ५४ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाची १५ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. (Ravindra Jadeja Retirement)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.