प्राचीन पांडवकालिन जोगेश्वरी व अंधेरी गुंफाचे संवर्धन करण्याची Ravindra Waikar यांची मागणी

36
प्राचीन पांडवकालिन जोगेश्वरी व अंधेरी गुंफाचे संवर्धन करण्याची Ravindra Waikar यांची मागणी
  • प्रतिनिधी 

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पांडवकालीन जोगेश्वरी व अंधेरी गुंफा यांची देखभाल व संवर्धन करण्याबरोबरच गुंफेच्या परिसरातील झोपडपट्टीचे पुनर्वसन करून परिसराचे सुशोभीकरण केल्यास गुंफेच्या सौंदर्यीकरणात पडेल, त्यामुळे याकडे लक्ष द्यावे, असा प्रस्ताव मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये लोकसभेत मांडलेला. तो स्वीकारण्यात आला असून शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Manu Bhaker : मनु भाकर राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही, त्या कालावधीत करणार युरोपमध्ये सराव)

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात पांडव कालीन प्राचीन जोगेश्वरी व अंधेरी गुंफा आहे. या गुंफा पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यंटकांबरोबरच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पर्यटकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. परंतु या दोन्ही गुंफाची देखभाल व संवर्धन करण्यात न आल्याने दोन्ही गुंफा जीर्ण अवस्थेत आहे. या दोन्ही गुंफाच्यावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत यात काही प्रमाणात वाढही होत आहे. येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून चांगली पक्की घरे देणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे पांडवकालीन गुंफेच्या सौंदर्यालाही बाधा पोहचत आहे. येथील जयंत चाळ, ब्राह्मण पुष्पकर्ण चाळ आदि चाळींच्या पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडला असून, तो मार्गी लवणेही अत्यंत गरजेचे आहे. (Ravindra Waikar)

(हेही वाचा – नाना पटोले यांचे रा.स्व. संघाशी संबंध म्हणून काँग्रेस हरली; Congress च्या गोटातून गंभीर आरोप)

या दोन्ही गुंफेचे संवर्धन व देखभाल करण्यासाठी खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar)  यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये विषय सभागृहात निवेदनाद्वारे मांडून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांचे लक्ष वेधले आहे. या निवेदनात खासदार वायकर यांनी प्राचीन पांडावकालीन जोगेश्वरी व अंधेरी गुंफेची देखभाल व संवर्धन करण्यात यावे. तसेच या गुंफेच्या परिसरातील झोपडीधारकांना मूलभूत सुविधांनी युक्त चांगली पक्की घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी वायकर यांनी निवेदनाद्वारे केली असून हे निवेदन सभागृहात स्वीकारण्यात आले असून ते शुक्रवारी पटलावर ठेवण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.