अँटॉप हिल येथील रावळी जलाशय टेकडीवरील गांधीया महादेव मंदिराच्या सभोवतालचा उतार धोकादायक बनला असून मंदिराजवळील टेकडीचा भाग खचत असल्याने या उताराचे काम करण्यात आले आहे. मात्र, आता या डोंगरावरील उताराची जागा अधिक मजबूत करण्यासाठी येथील जमिनीच्या रचनेनुसार वेगवेगळ्या उंचीची गॅबियन भिंत बांधण्याचा आणि या टेकडीच्या भागातील कमकुवत खडकांचे ग्राऊटींग करणे, त्यातील छेद ग्राऊटिंग करून बंद करण्याची कामे हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे मंदिराकडे जाणारा मार्ग अतिरिक्त गॅबियन भिंतीमुळे अधिक मजबूत करण्यात आला आहे. (Ravli Hill)
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या रावळी टेकडीवर जलाशय आहे. या जलाशयाच्या उत्तर दिशेला गांधीया महादेव समिती मंदिर असून या मंदिराच्या लागत असलेल्या उतारावरील भाग ढासळलेल्या परिस्थिती असल्यामुळे येथील भाग खचण्याच्या परिस्थितीत आहे. परिणामी भविष्यात वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने या टेकडीच्या भागाचे मजबुतीकरण करण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली होती. यासाठी जानेवारी २०२२मध्ये शंखेश्वर एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Ravli Hill)
(हेही वाचा – EVM VVPAT वर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला)
या कामाची एकूण किंमत इतक्या लाखांवर
यामध्ये रावळी जलाशयाच्या उतारावरील भागाचे तातडीने काम करणे आवश्यक असल्याचे ठरवण्यात आले. हे काम तांत्रिकदृष्ट्या किचकट, कठीण आणि आव्हानात्मक असल्यामुळे टेकडीच्या भागाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यासाठी व्हिजेटीआयची निवड करण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाच्या वेळी भूरचना यामध्ये मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे कामाच्या प्रगती दरम्यान कामाच्या अभियांत्रिकी संकल्प रचनेत काही प्रमाणात बदल करावा लागला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टेकडीच्या वरील बाजुस अतिरिक्त गॅबियन भिंत ही उताराच्या मजबुतीकरता करणे आवश्यक ठरले. त्यामुळे चालू कंत्राटदाराकडूनच हे काम करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (Ravli Hill)
त्यामुळे यापूर्वीच्या कामांसाठी २ कोटी ६ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु आता अतिरिक्त कामांसाठी सुमारे ३१ लाखांचा खर्च वाढला असून या कामाची एकूण किंमत २ कोटी ३७ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. (Ravli Hill)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community