- ऋजुता लुकतुके
जे लोक शेअर बाजारातील उतार चढावांवर नियमितपणे लक्ष ठेवून असतात, त्यांच्या नजरेतून रेमंड्स कंपनीतील शेअरमध्ये झालेली घसरण सुटलेली नसणार. गुरुवारी शेअर बाजार उघडताच रेमंड्स इंडस्ट्रीजचा शेअर ३,१५६ वरून थेट १,९१० वर आला. ही घसरण जवळ जवळ ४० टक्के इतकी मोठी होती. पण, या घसरणीमुळे नवीन गुंतवणुकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. रेमंड इंडस्ट्रीजमधून रेमंड लाईफस्टाईल्स ही कंपनी वेगळी होत आहे. आणि या विलिनीकरणात रेमंड इंडस्ट्रीजच्या सध्याच्या ग्राहकांना ५ रेमंड शेअरसाठी ४ लाईफस्टाईल कंपनीचे शेअर मिळणार आहेत. हे गुणोत्तर ठरवून झाल्यावर गुरुवार ११ जुलै ही कट-ऑफ तारीख असल्यामुळे रेमंडचा शेअर फक्त तांत्रिकदृष्ट्या घसरला. (Raymond Share Price)
शेअरचं विभाजन झाल्यावर शुक्रवारी लगेच तो ३ टक्क्यांनी वरही आला होता. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना रेमंडचा शेअर ५ टक्क्यांची किंवा १०० अंशांची वाढ होऊन २,१०१ वर बंद झाला. (Raymond Share Price)
(हेही वाचा – मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे लक्ष्य; PM Narendra Modi यांची घोषणा)
रेमंड शेअरचं विभाजन पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या शेअरचं मूल्य १,४०० च्या आसपास असेल असा अंदाज एमओएफसीएलने व्यक्त केला आहे. तर रेमंडपासून विभाजन झाल्यावर लाईफस्टाईल उद्योगाचा शेअर १,९०० च्या आसपास असेल असाही संस्थेचा अंदाज आहे. इतर अनेक मोठ्या उद्योजकांसारखीच रेमंड कंपनीही आपल्या सगळ्या उद्योगांचं विभाजन करून नवीन कंपन्या स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आहे. रेमंड लिमिटेड या कंपनीतून लाईफस्टाईल, रियल इस्टेट असे उद्योग वेगळे करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लाईफस्टाईल कंपनी येत्या ऑगस्ट महिन्यात शेअर बाजारात नव्याने नोंदणीकृत होईल. तर पुढील १५ महिन्यांत रियल इस्टेट कंपनीही वेगळी होईल अशी लक्षणं आहेत. त्यामुळे रेमंड कंपनीच्या शेअरवर येणाऱ्या दिवसांत तज्ज्ञांचं लक्ष असेल. (Raymond Share Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community