भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रविवार, 31 मार्च रोजी बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने X वर ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे.
(हेही वाचा – Supreme Court : वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करणे त्रासदायक; न्यायालयाची ईडीच्या कार्यशैलीवर नाराजी)
चालू आर्थिक वर्षाचा (2023-24) शेवटचा दिवस रविवारी असल्याने आरबीआयकडून (RBI) हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआयने सांगितले :
सामान्यतः सर्व बँकांना रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. पण नुकताच आरबीआयने (RBI) आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “भारत सरकारने सरकारी पावत्या आणि देयके हाताळणाऱ्या बँकांच्या सर्व शाखांना ३१ मार्च २०२४ (रविवार) रोजी व्यवहारांसाठी खुले ठेवण्याची विनंती केली आहे जेणेकरून आर्थिक वर्ष २०२३ – २४ मधील प्राप्ती आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांचा हिशेब राहील.
(हेही वाचा – Virat Kohli : कोहलीला या नावाने हाक मारली तर तो बेचैन का होतो?)
त्यानुसार, एजन्सी बँकांना ३१ मार्च २०२४ (रविवार) रोजी सरकारी व्यवसाय हाताळणाऱ्या त्यांच्या सर्व शाखा खुल्या ठेवण्याचा सल्ला (RBI) देण्यात आला आहे.
All Agency Banks to remain open for public on March 31, 2024 (Sunday)https://t.co/7eI5CZtlh0
— ReserveBankOfIndia (@RBI) March 20, 2024
एजन्सी बँका म्हणजे काय?
एजन्सी बँका म्हणजे अशा व्यावसायिक बँका ज्यांना (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी आणि सरकारच्या वतीने विविध बँकिंग उपक्रम करण्यासाठी नियुक्त केले आहे. देशभरातील सरकारी व्यवहार आणि सेवा सुलभ करण्यात या बँकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारतातील एजन्सी बँकांद्वारे केल्या जाणाऱ्या काही प्रमुख कार्यांमध्ये कर संकलन आणि सरकारी देयकांचे वितरण यांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community