RBI ने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 5 बेसिस पाॅईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यावंर गेला आहे.
RBI ने रेपो दरात वाढ केल्याने, गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज जर वाढवल्याने, बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते.
( हेही वाचा: राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; न्यायालय अजामीनपात्र अटक वाॅरंट बजावणार? )
एकाच महिन्यात 90 बेसिसची वाढ
याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या माॅनिटरी पाॅलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पाॅईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला. त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पाॅईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पाॅईंटची वाढ केली होती.
Join Our WhatsApp Community