- ऋजुता लुकतुके
देशाच्या मालकीचं सोनं देशातच साठवलं जावं या विचाराने रिझर्व्ह बँकेनं या दिवाळीत बँक ऑफ लंडनच्या तिजोरीत असलेलं १०२ टन सोनं भारतात परत आणलं आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत भारताच्या एकूण तिजोरीत ८५५ टन इतकं सोनं होतं. त्यातील ५१०.५ टन सोनं आता देशांतच साठवलं जात आहे. सुरक्षितचेचा उपाय म्हणून मध्यवर्ती बँकेनं सोनं देशातच साठवण्याचा निर्णय घेतला आहे. (RBI Gold Recovery)
लंडनहून भारतात सोनं आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कडेकोट बंदोबस्त केला होता. त्यासाठी खास विमानाची सोय करण्यात आली होती. विमानांची सुरक्षा व्यवस्थाही चोख होती. सोन्याच्या हस्तांतरणाची बातमी कुठेही फुटू नये यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. (RBI Gold Recovery)
(हेही वाचा – ऐन विधानसभा निवडणुकीत वंचितचे अध्यक्ष Prakash Ambedkar यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल)
भारताच्या मालकीचं सुमारे ३२४ टन सोनं अजूनही बँक ऑफ लंडनच्याच तिजोरीत आहे. आपण ते तिथे ठेवण्यासाठी दिलं आहे. लंडनच्या बुलियन बाजारपेठेच्या जवळ बँक ऑफ लंडन असल्यामुळे रोखतेच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली होती. जगभरात लंडनची बुलियन बाजारपेठ ही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे जगातील इतर देशांमधूनही ५,३५० टन सोनं बँक ऑफ लंडनकडे साठवलं जातं. (RBI Gold Recovery)
भारताकडे सध्या पुरेसा सुवर्ण साठा आहे. देशाच्या एकूण परकीय गंगाजळीतील ९.३ टक्के वाटा हा सोन्याच्या स्वरुपात आहे. मार्च २०२४ मध्ये हे प्रमाण ८.१ टक्के इतकं होतं. (RBI Gold Recovery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community