RBI Governor of India : रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा कोण आहेत?

RBI Governor of India : शक्तिकांत दास यांच्या जागी आता मल्होत्रा यांची नियुक्ती झाली आहे

136
RBI Governor of India : रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा कोण आहेत?
RBI Governor of India : रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा कोण आहेत?
  • ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा आजपासून (११ डिसेंबर) कार्यभार स्वीकारतील. शक्तिकांत दास यांनी ६ वर्षं हे पद निभावल्यानंतर आता ते पदावरून पायउतार झाले आहेत. कोव्हिडच्या कालावधीत ढासळलेली जागतिक अर्थव्यवस्था आणि त्यानंतर युद्धाची अनिश्चितता असा कठीण परिस्थितीत दास यांनी मध्यवर्ती बँकेचा डोलारा सांभाळला. आता त्यांची जागा प्रशासकीय सेवेत राजस्थान केडरमधून प्रवेश केलेले संजय मल्होत्रा घेणार आहेत. (RBI Governor of India)

(हेही वाचा- बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Pocso Act) ३५ प्रकरणांवर सुनावणी)

देशावर वाढत्या महागाईचं सावट असताना शक्तिकांत दास यांनी सलग दोन वर्षं रेपो दर स्थिर ठेवण्याचं आव्हान पेललं आहे. आता संजय मल्होत्रा पदभार स्वीकारतील तेव्हा विकास दर स्थिर राखण्याचं सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल. कारण, कारण, तिमाहीत जीडीपी विकास दर ५.४ टक्क्यांवर आलेला असताना ते ही जबाबदारी स्वीकारत आहेत. (RBI Governor of India)

१९९० साली भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण झालेले संजय मल्होत्रा हे संगणक विज्जान शाखेचे आयआयटी पदवीधर आहेत. तर पब्लिक पॉलिसी या विषयात त्यांनी प्रिन्सटन या अमेरिकेतील विद्यापीठातून त्यांनी स्नातकोत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी अर्थ, ऊर्जा, माहिती – तंत्रज्जान आणि कर निर्धारण असा महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केलं आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल खात्याचे सचिव म्हणून कार्यरत होते. ग्रामीण भागात वीज पोहोचवण्यासाठी निर्मिती झालेल्या आरईसीएल कंपनीत त्यांनी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. (RBI Governor of India)

(हेही वाचा- मोफत धान्य किती दिवस पुरवणार? रोजगार निर्मितीवर लक्ष्य द्या ; Supreme Court)

वित्त आणि कर रचना हा संजय मल्होत्रा यांचा आवडता विषय आहे. आणि या क्षेत्रात सरकारी पातळीवर त्यांनी कामही केलं आहे. कर बुडवेगिरी, चुकवेगिरी कशी थांबेल आणि सरकारचा महसूल कसा अचूक राहील यावर त्यांनी संशोधन केलं आहे. आणि त्यावर आधारित योजना सरकारमध्ये राबवल्याही आहेत. आता त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे ती देशाची आर्थिक धोरणं, पतधोरणं अधिकाधिक लोकाभिमुख करण्याची. आणि बदलत्या भूराजकीय परिस्थितीत देशाचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची. महागाई, अमेरिकन डॉलरसमोर ढासळणारा रुपया अशी आव्हानं सुरुवातीलाच संजय मल्होत्रा यांना पेलायची आहेत. (RBI Governor of India)

दरम्यान, मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी (१० डिसेंबर) आपला रिझर्व्ह बँक कार्यालयातील शेवटचा दिवस पूर्ण केला. आणि कार्यालय सोडताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि रिझर्व्ह बँकेतील त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. (RBI Governor of India)

(हेही वाचा- No Confidence Motion : इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभा सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; मंजूर होणार का ?)

शक्तिकांत दास यांनी वेगवेगळ्या ५ ट्विट्समधून पंतप्रधान, अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेतील त्यांचे सहकारी, जनता आणि वित्तीय क्षेत्रातील लोकांचे आभार मानले आहेत. ‘रिझर्व्‍ह बँकेतील माझ्या सहकाऱ्यांचे खूप सारे आभार. तुमच्यामुळेच आपण सगळे मिळून जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेला बसलेल्या धक्क्यातून देशाला सावरू शकलो,’ असं ते शेवटच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. (RBI Governor of India)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.