तुमचे ‘या’ बँकांमध्ये खातं आहे? RBI च्या घोषणेनंतर मिळणार मोठा फायदा!

138

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा पॉलिसी व्याजदर रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह, रेपो दर 5.90 वरून 6.25 टक्के झाला. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही बुधवारी घोषणा केली. यादरम्यान, जर आपण पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एखादा चांगला पर्याय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यायांसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्या ठिकाणी पैसे गुंतवून तुम्ही चांगला परतावा अथवा नफा मिळवू शकतात.

(हेही वाचा – Pension Scheme: विवाहित जोडप्याला मोदी सरकार दर महिन्याला देणार १८,५०० रुपये! पण ‘ही’ आहे अट)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे, यामुळे अनेक बँका आपल्या एफडीचे दरही वाढवताना दिसत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे पैसे फिक्स डिपॉझिटही करू शकतात. यासह तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्येही 2 वर्षांची गुंतवणूक करू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकने व्याजदर रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली असून ईएमआय वाढीसह तुम्हाला बँक एफडीवरही अधिक व्याज मिळणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याजाचा फायदा देत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे फिक्स डिपॉझिट करून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेऊ शकता.

HDFC, ICICI बँक

HDFC ही बँक सामान्य ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या फिक्सड डिपॉझिटवर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे. तसेच खासगी क्षेत्रातील ICICI Bank देखील सामान्य नागरिकांना 2 ते 3 वर्षांच्या फिक्सड डिपॉझिटवर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल ही बँक सामान्य ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या फिक्सड डिपॉझिटवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहे.

पोस्ट ऑफिस स्किम 

याशिवाय पोस्ट ऑफिसच्या 2 वर्षांच्या एफडीवर 5.7 टक्के दराने व्याज मिळत आहे. तसेच, तुम्ही 3 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.