RBI ने जारी केले नवे नियम; आता बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्यास मिळणार भरपाई!

120

ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) नवे नियम जारी केले आहेत. बॅंकेच्या लॉकर संदर्भात काही नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामुळे बॅंकांची जबाबदारी आणखी वाढणार असून ग्राहकांना याचा अधिक फायदा मिळणार आहे. कर्ज देण्याच्या नियमात बदल केल्यानंतर आता आरबीआयने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. जर तुम्ही कोणत्याही बँकेत लॉकर उघडले असेल किंवा ते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )

हे आहेत नवे नियम…

  • अनेकदा बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडतात. मात्र आता बँकेच्या लॉकरमधून काही चोरीला गेल्यास संबंधित बँकेच्या वतीने ग्राहकाला लॉकर भाड्याच्या 100 पट भरपाई दिली जाईल. आजवर बँका चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष करून त्याला जबाबदार नसल्याचे सांगत होत्या.
  • आरबीआयने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, बँकांना रिकाम्या लॉकर्सची यादी, लॉकरसाठीची वेटिंग लिस्ट प्रदर्शित करावी लागणार आहे. ग्राहकांना योग्य माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. असे आरबीआयचे मत आहे.
  • आता जेव्हाही तुम्ही तुमच्या लॉकररूममध्ये प्रवेश कराल, तेव्हा तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट केले जाईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हा नियम आरबीआयने बनवला आहे.
  • नवीन नियमांनुसार बँकांना जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी लॉकरचे भाडे घेण्याचा अधिकार आहे. जर तुमच्या लॉकरचे भाडे 2000 रुपये असेल तर बँक तुमच्याकडून इतर देखभाल शुल्क वगळता 6000 रुपयांपेक्षा जास्त दर आकारू शकत नाही.
  • आता लॉकर रूममध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणे आवश्यक आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजचा डेटा १८० दिवसांसाठी ठेवावा लागणार आहे. चोरी किंवा सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळल्यास आता पोलिसांना सुद्धा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.