RBI ने 180 बॅंकांना ठोठावला दंड; कोट्यावधी ग्राहकांना बसणार फटका

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने कडक धोरण अवलंबले आहे. त्यानुसार, 180 बॅंकांवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयच्या अनेक नियमांचे उल्लघंन केल्याबद्दल या बॅंकांना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या बॅंकांवर 12 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे तुमचेही या बॅंकेत खाते असेल तर कोणत्या बॅंकांवर कडक कारवाई केली आहे आणि त्यामागील कारण काय, ते जाणून घ्या.

रिझर्व्ह बॅंकेने 22 सहकारी बॅंकांना दंड ठोठावला आहे. 2021 पर्यंत हा आकडा 124 बॅंकांपर्यंत पोहोचला होता. त्याचवेळी डिसेंबर महिन्यात आरबीआयने 33 बॅंकांवर आणखी दंड ठोठावला. रिझर्व्ह बॅंकेने 19 डिसेंबरला 20 बॅंकांवर तर 12 डिसेंबरला 13 सहकारी बॅंकांवर दंड ठोठावला.

( हेही वाचा: महत्त्वाची बातमी; पोलादपूर- महाबळेश्वरला जोडणारा ‘हा’ घाट 4 जानेवारीला राहणार बंद )

रिझर्व्ह बॅंकेने माहिती देताना म्हटले आहे की, बॅंकिंग प्रणाली सुधारण्यासाठी आणि सदोष काॅर्पोरेट गव्हर्नन्ससह फसवणुकीसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आरबीआयकडून अनेक कडक पावले उचलली जात आहेत. RBI कडून बॅंकांच्या कामकाजावर पाळत ठेवली जात आहे. दोन वर्षांपूर्वी नियमांमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर, ग्राहकांना कोणत्याही प्रकराची अडचण येऊ नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंका आणि त्यांच्या कामकाजावर पूर्णपणे लक्ष ठेवले जात आहे. यासोबतच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दोन वर्षांपूर्वी थकबाकीदार सहकारी बॅंकांवर पर्यवेक्षकीय मालमत्ता मिळाल्यानंतर, एका वर्षात मध्यवर्ती बॅंकेने जारी केलेल्या दंडाचे हे सर्वात मोठे कारण आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here