भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन खाजगी क्षेत्रातील बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी ICICI बँकेवर १२. १९ कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेवर ३. ९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी सेंट्रल बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय आणि इंडियन बँकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला होता. (RBI Fine )
ही कारवाई बँकेनं नामनिर्देशित केलेल्या रिकव्हरी एजंटमधील कमतरता, ग्राहक सेवा आणि कर्ज, तसेच, आगाऊ तरतुदींशी देखील संबंधित आहे. बँकेचं वैधानिक लेखापरीक्षण ३१ मार्च २०२२ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारे करण्यात आलं आहे.
दंड आकारणीबाबत माहिती देताना आरबीआयने सांगितले की, नियमांचे पालन न केल्यामुळे या दोन्ही बँकांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. RBI ने ICICI बँकेला कर्ज आणि अॅडव्हान्सशी संबंधित निर्बंधांचे पालन न केल्यामुळे आणि अहवालाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये आचारसंहितेशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, दोन्ही प्रकरणांमध्ये नियामक तरतुदींचे पालन करण्यात चूक झाल्यामुळे बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
(हेही वाचा : Diwali Bonus : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट)
गेल्या एका महिन्यात मध्यवर्ती बँकेने सुमारे २० सहकारी, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दंड ठोठावला आहे. सर्वाधिक दंड ICICI बँकेला ठोठावण्यात आला आहे. सेंट्रल बँक वेळोवेळी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारते. मात्र त्याचा बँक खातेदारांवर कोणताही परिणाम होत नाही. ग्राहक पूर्वीप्रमाणेच त्यांच्या खात्यातून पैसे काढू आणि जमा करू शकतात.आरबीआय ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे, जी व्याजदरापासून बँकांपर्यंतचे बँकिंग नियम बनवते, ज्याचे बँकांना पालन करावे लागते. जर कोणत्याही बँकेने या नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा त्याचे उल्लंघन केले तर आरबीआय त्या बँकेवर कारवाई करते. अनेक प्रसंगी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करताना बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community