FD वर मिळणार आता अधिक व्याज

132

Reserve bank of India: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यामुळे आता बॅंकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. SBI, Axis bank, canara bank, yes bank आणि Indian overseas bank यांच्यानंतर आता Indusind bank ने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले आहेत. इंडसइंड बॅंकेतील एफडीवर आता कमाल 6.75 टक्के व्याज मिळेल.

कुठे किती व्याजदर?

  • इंडसइंड बॅंकेतील 7 ते 30 दिवसांच्या ठेवींवर आता 3.5 टक्के तसेच 31 ते 60 दिवसांच्या ठेवींवर 4 टक्के व्याज मिळेल.
  • याशिवाय 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.25 टक्के, 91 ते 120 दिवसांच्या ठेवीवर 4.50 टक्के, 121 ते 180 दिवसांच्या ठेवीवर 4.75 टक्के, 211 ते 269 दिवसांच्या ठेवीवर 5.25 टक्के आणि 269 ते 364 दिवसांच्या ठेवीवर 5.50 टक्के दराने व्याज मिळेल.
  • 1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांच्या आतील ठेवीवर 6.25 टक्के, 1 वर्ष 6 महिने ते 61 महिन्यांच्या आतील ठेवींवर 6.75 टक्के आणि 61 महिन्यांपेक्षा अधिक मुदतीच्या ठेवींवर 6.25 टक्के व्याज मिळेल.

( हेही वाचा: किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश, हायअलर्ट जारी – फडणवीस )

5 वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत

टाइम डिपाॅजिटल स्कीम आणि एफडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अन्वये आयकरात सूट मिळते. 1.50 लाखांपर्यंतची गुंतवणूक यात करमुक्त असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.