RBI on Food Inflation : रिझर्व्ह बँकेच्या न्यूजलेटरमध्येही अन्नधान्याच्या वाढत्या महागाईवर चिंता

RBI on Food Inflation : अन्नधान्यातील महागाईमुळे व्याजदर कमी करता येणार नाहीत, असा सूर मध्यवर्ती बँकेनं आळवला आहे. 

124
RBI on Food Inflation : रिझर्व्ह बँकेच्या न्यूजलेटरमध्येही अन्नधान्याच्या वाढत्या महागाईवर चिंता
  • ऋजुता लुकतुके

अन्नधान्याच्या किमती अजूनही चढ्याच आहेत. हवामानातील बदलांचा विपरित परिणाम कृषि उत्पादनावर होत असल्यामुळे भाज्या, फळं, धान्य यांच्या किमती अजूनही आटोक्यात येत नाहीत. अन्नधान्याचा महागाई दर अजूनही ७ टक्क्यांपेक्षा जास्तच आहे. अशावेळी सर्वसामान्यांवर वाढत्या किमतींचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे जोपर्यंत ही महागाई कमी होत नाही, तोपर्यंत व्याजदर कमी करता येणार नाहीत, अशीच भूमिका रिझर्व्ह बँकेनं ऑगस्ट महिन्यातील न्यूडलेटरमध्ये घेतली आहे. (RBI on Food Inflation)

‘अनियमित पाऊस तसंच हवामानातील बदलांचा प्रतिकूल परिणाम कृषि उत्पादनावर झाल्यामुळे शेतमालाचा पुरवठा नियमित होत नाही. आणि पुरवठा अचानक थांबला तर त्यामुळे भाज्या, फळे, धान्य यांच्या किमती वाढतात. या महागाईचा परिणाम अन्नधान्येतर वस्तूंच्या दरवाढीतही दिसून आला आहे. या सगळ्याचा एकत्र परिणाम म्हणून रेपो दरही इतक्यात कमी करता येणार नाहीत,’ असं या न्यूजलेटरमध्ये म्हटलं आहे. (RBI on Food Inflation)

(हेही वाचा – Ind vs Aus, Border-Gavaskar Trophy : रोहित, विराटची नाही तर ‘या’ फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला भीती)

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मांडली ‘ही’ भूमिका 

मध्यवर्ती बँकेच्या धोरणात्मक व आर्थिक संशोधन विभागाकडून दर महिन्याला आरबीआय न्यूजलेटर प्रसिद्ध करण्यात येतं. रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक गव्हर्नर मायकेल देवव्रत पात्रा यांच्या संपादनाखाली हे न्यूजलेटर तयार होतं. या न्यूजलेटरचा रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती समितीशी कोणताही संबंध नसला तरी यात व्यक्त होणारी मतंही रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांचीच असल्यामुळे त्याला महत्त्व आहे. (RBI on Food Inflation)

ऑगस्ट महिन्यातच द्विमासिक पतधोरणासाठी झालेल्या बैठकीत मध्यवर्ती बँकेनं रेपो दर सलग सातव्यांदा कायम ठेवला होता. आणि तेव्हाही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अन्नधान्याच्या किमती आटोक्यात येईपर्यंत रेपो दर कमी करता येणार नाही, अशीच भूमिका मांडली होती. त्याचबरोबर ग्रामीण भागातील वस्तू व सेवांची मागणी वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. (RBI on Food Inflation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.