भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक झाली असून बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नव्या वर्षातील पहिले पतधोरण जाहीर केले आहे. तीन दिवस चाललेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात ०.२५ बेस पॉईंटने वाढ जाहीर केली असून केंद्रीय बॅंकेचा व्याजदर ६.५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे.
( हेही वाचा : तुर्की-सीरियामध्ये मृत्यूतांडव! ३ महिने आणीबाणी लागू )
रेपो दरवाढ
रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात सलग ५ वेळा वाढ केली आहे. यासह रेपो दर ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदाही RBI ने दरवाढ कायम ठेवली असून रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची वाढ जाहीर केली आहे. यामुळे बॅंका आणि वित्तीय संस्था व्याजदरात सुधारणा करतील आणि परिणामी गृहकर्ज सुद्धा महागणार आहेत. ज्यांनी आधीच कर्ज घेतले आहे त्यांचा EMI महागणार आहे. वाढत्या महागाईच्या दरामुळे RBI ने रेपो दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
सलग ५ वेळा वाढ
एका वर्षात RBI ने एकूण २.२५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली असून रेपो दरात सलग ५ वेळा वाढ केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये RBI ने व्याजदरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली होत. रेपो दर वाढल्याने आता सर्वसामान्य नागरिकांचे कर्ज आणि ईएमआय महाग झाले आहेत.
Join Our WhatsApp Community