RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेकडून ०.२५ टक्क्यांची रेपोदर कपात, विकासदर स्थिर असल्याचा निर्वाळा

72
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेकडून ०.२५ टक्क्यांची रेपोदर कपात, विकासदर स्थिर असल्याचा निर्वाळा
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेकडून ०.२५ टक्क्यांची रेपोदर कपात, विकासदर स्थिर असल्याचा निर्वाळा
  • ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांचा कार्यकाळच मूळात व्यापारी युद्धाच्या नांदीने सुरू झाला आहे. त्याचेच पडसाद आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणावर दिसलं. पण, त्यावेळी भारतावर जागतिक परिस्थितीचा थोडा कमी परिणाम जाणवेल अशी आश्वासकताही मल्होत्रा यांच्या भाषणात जाणवत होती. आपल्या पहिल्याच पतधोरणात मल्होत्रा यांनी रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करून ६ टक्क्यांवर आणला आहे. शिवाय आर्थिक वर्षांत देशाचा जीडीपी विकास दर ६.६ टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे. अन्न धान्याच्या किमती कमी होत असल्यामुळे रेपो दर कपात शक्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच नवीन मान्सून हंगामात पाऊस १०३ टक्के असण्याचा अंदाज असल्यामुळे ही बैठक बरीचशी सकारात्मक वातावरणातच पार पडली. (RBI Repo Rate)

पतधोरण समितीच्या सहाही सदस्यांनी दर कपातीच्याच बाजूने कौल दिला. पण, त्याचवेळी जागतिक अस्थिरता आणि व्यापारी युद्धाची भीती याचा फटका निर्यातीला बसणार असल्याचंही त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. देशाचा सीपीआय महागाई दर हा ४.५ टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनातही तो विश्वास जागवावा यासाठी दर कपात गरजेची आहे असंच मत संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी व्यक्त केलं. (RBI Repo Rate)

(हेही वाचा – Kedar Jadhav : माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवची नवीन राजकीय इनिंग, भाजपामध्ये प्रवेश)

शिवाय देशात सध्या मोठया प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहत आहेत. त्यांच्यासाठी ही दरकपात महत्त्वाची असेल. देशातील उत्पादन क्षेत्र वाढतंय. आणि पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत. अशावेळी दर कपात झाली तर या प्रकल्पांचा खर्च कमी होईल. त्यातून लोकांना रोजगारही मिळेल, असं मध्यवर्ती बँकेचं मत पडलं. (RBI Repo Rate)

ताज्या पतधोरणातील महत्त्वाचे मुद्दे पाहूया,
  • सुधारित रेपो दर ६ टक्के इतका असेल. यात २५ अंशांची घट करण्यात आली आहे.
  • महागाई दर कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्यातील किरकोळ महागाई दर ३.६१ टक्के
  • अर्थव्यवस्था ‘स्थिर’ असल्याचा निर्वाळा
  • जागतिक वातावरण अस्थिर असल्याचं निरीक्षण, त्यामुळे विकासाला खिळ बसण्याची भीती
  • नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून उत्पादन क्षेत्राचा विकासदर वाढण्याची शक्यता
  • शहरी भागातून अजूनही वस्तू व सेवांना तितकीशी मागणी नाही
  • रोजगार वाढवणे, आयकर कपात आणि महागाई नियंत्रणा आणण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा
  • रब्बी उत्पादन चांगलं झाल्यास महागाई दर आणखी आटोक्यात येण्याचा विश्वास
  • देशाचा विकासदर ६.४ टक्के राहण्याचा अंदाज

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.