-
ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२५ मधील आपल्या चौथ्या द्वैमासिक पतधोरणाच्या बैठकीत रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दर ६.५० टक्क्यांवर कायम असतील. एकूण सलग दहाव्यांदा रेपो दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. पण, यंदा मध्यवर्ती बँकेनं रेपो दरावर टिप्पणी करताना त्याच्यासमोर ‘न्यूट्रल’ असा कौल दिला आहे. म्हणजेच व्याज दराबाबतीतील सरकारचं धोरण स्थिर असणार आहे. येणाऱ्या दिवसांत सामान्य नागरिकांना कुठल्याही कर्जावर जास्तीचा हप्ता भरावा लागणार नाहीए एवढं नक्की आहे. (RBI Repo Rate)
(हेही वाचा- Indian Army: दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण! एक जवान तावडीतून सुटला)
आता युपीआय लाईट वॉलेटमध्ये तुम्ही ५,००० रुपये जमा करू शकणार आहात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. त्याचबरोबर ‘महागाईचा वारू तबेल्यात बंद करण्यात आपण यशस्वी झालो आहोत,’ असे दिलासादायक उद्गारही शक्तिकांत दास यांनी काढले. कारण, ताजा महागाई दर हा ४,८ टक्क्यांवर आला आहे. मध्यवर्ती बँकेनं महागाई दर २ ते ५ टक्क्यांच्या मध्ये ठेवण्याचं उद्दिष्टं ठेवलं आहे. (RBI Repo Rate)
Insert tweet – https://twitter.com/Aditya_Hujband/status/1843875667253047438
इतर चलनांच्या तुलनेत रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं जीडीपी विकास दराचं उद्दिष्टही ७.२ टक्क्यांवर कायम ठेवलं आहे. पतधोरणाच्या बैठकीतील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया, (RBI Repo Rate)
(हेही वाचा- Mumbai Water Supply : मुंबईमधील ‘वडाळा,शीव आदी भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा)
-
रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर
-
पतधोरण समितीतील ५ सदस्यांचं रेपो दर जैसे थे ठेवण्याच्या बाजूने मतदान, तर डॉ. नागेश कुमार यांचं रेपो दर २५ अंशांनी कमी करण्याचं मत
-
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत प्रमुख ८ उद्योगांचं उत्पादन घटलं, अनियमित पावसाचा ऊर्जा, कोळसा आणि सिमेंट उद्योगाला फटका
-
आर्थिक वर्ष २०२५ चा जीडीपी विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज
-
चालू आर्थिक वर्षात महागाई दरही ४.५ टक्के असा आटोक्यात राहण्याच अंदाज
-
इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची डॉलरविरोधातील कामगिरी स्थिर
-
बँकेतर वित्तीय संस्थांच्या कामगिरीवर आणि अनियमिततेवर मध्यवर्ती बँकेची करडी नजर, सध्या या संस्थांनीच कामगिरी सुधारण्यावर लक्ष ठेवावं, अन्यथा मध्यवर्ती बँकेची हस्तक्षेपाची तयारी
हेही पहा-
Join Our WhatsApp Community