कर्जे महागणार?

98

भारतीय रिझर्व्ह बँक शुक्रवारी, ८ एप्रिल २०२२ रोजी द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. या पतधोरणात बँकेकडून महागाईचा अंदाज वाढवला जाण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम थेट कर्जांवर होणार आहे. फेब्रुवारीतील पतधोरणात आरबीआयने रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला होता.

मे २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केला 

कोरोना संकटातून अर्थव्यवस्था बऱ्यापैकी सावरली आहे. मार्च २०२२ मध्ये आजवरचा सर्वाधिक कर महसूल सरकारला मिळाला. मात्र याच दरम्यान वाढत्या महागाईने बँकेपुढे नवे आव्हान उभे केले आहे. महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आणखी उपाय योजना या पतधोरणात केल्या जातील. बँकेने फेब्रुवारी महिन्यातील पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवले होते. गव्हर्नर शक्तिकांत दास आर्थिक वर्षातील पहिले पतधोरणात जाहीर करतील. बँकेने सलग दहाव्यांदा पतधोरणात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी मे २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदर कमी केला होता.

(हेही वाचा आता भोंग्यांविरुद्धचा ‘आवाज’ मनसे न्यायालयात उठवणार?)

अमेरिकेत महागाईने ४० वर्षांचा उच्चांकी स्तर गाठला

मागील दोन महिन्यात घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा भडका उडाला आहे. अमेरिकेत महागाईने ४० वर्षांचा उच्चांकी स्तर गाठला. तेथील केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने बॉण्ड खरेदी आटोपती घेऊन व्याजदर वाढवले होते. फेडरलने व्याजदरात ०.२५ टक्के वाढ केली होती. याच भूमिकेचे रिझर्व्ह बँकेकडून अनुकरण केले जाईल, अशी शक्यता बँकिंग क्षेत्रातील काही जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.