महिंद्रा फायनान्सवर आरबीआयची मोठी कारवाई, आता करता येणार नाही ‘हे’ काम

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा फायनान्स कंपनीवर रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी कारवाई केली आहे. महिंद्रा फायनान्सच्या वसुली एजंटने हजारीबाग येथील केलेल्या गैरकृत्याची आरबीआयने गंभीर दखल घेतली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सतर्फे बाहेरील एजंटकडून केली जाणारी वसुली आरबीआयने आता बंद केली आहे.

आरबीआयची कारवाई

हजारीबाग येथे महिंद्रा फायनान्सच्या वसुली एजंटने एका दिव्यांग शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले होते. या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचीच दखल घेत आरबीआयने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेडने आऊटसोर्स केलेल्या एजंटकडून वसुली करण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ही कंपनी वसुली एजंटमार्फत कर्जदारांकडून वसुली करू शकत नाही.

हजारीबाग येथील घटना

झारखंड राज्यातील हजारीबाग येथे महिंद्रा फायनान्सच्या वसुली एजंटने एक दिव्यांग शेतकऱ्याच्या मुलीला ट्रॅक्टर खाली चिरडल्याची घटना घडली होती. दिव्यांग शेतकरी मिथिलेश मेहता यांनी महिंद्रा फायनान्स कडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. या ट्रॅक्टरचे हप्ते वेळेवर न भरल्याने महिंद्रा फायनान्सच्या वसुली एजंटने जबरदस्ती ट्रॅक्टर ओढून नेला. यावेळी त्या शेतकऱ्याची गर्भवती मुलगी जागीच ठार झाली होती. याप्रकरणी महिंद्रा फायनान्सचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करत दुःख व्यक्त केले होते तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here