RBI ने ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई; तुमचं खात तर नाही ना?

166

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बॅंकेवर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने आणि सूचनांचे पालन न केल्याने या बॅंकेवर कारवाईचा बडगा उचलला आहे. काही दिवसांपूर्वी RBI ने 9 बॅंकांना दंड ठोठावला होता.

सूचनांचे पालन न केल्याने मुंबईतील एक सहकारी बॅंकेला सव्वा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या भरमसाठ दंडात विधेयकांच्या सवलतीशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावण्यात आल्याचे निवेदनात RBI ने म्हटले आहे.

ZOrostrian Co- Operative Bank या बॅंकेने काही नियम मोडल्याने त्या बॅंकेवर कारवाई करण्यात आली. लेटर ऑफ क्रेडिट आणि नियमांच्या तरतुदींवरील निर्देशांचे पालन ही बॅंक करु शकली नाही. 8 वर्षांतील रेकाॅर्डमध्येही गोंधळ असल्याचे RBI समोर उघड झाले आहे.

लखनऊतील बॅंकेला 20 लाख रुपयांचा दंड

केंद्रीय बॅंकेच्या स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, अनुत्पादक मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित काही निकषांचे पालन न केल्याबद्दल इंडियन मर्कंटाईल- को ऑपरेटिव्ह बॅंक, लखनऊवरही कारवाई करण्यात आली. या बॅंकेला जवळपास 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आरबीआयने इतर पाच सहकारी बॅंकांनाही दंड ठोठावला आहे.

( हेही वाचा: नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधील जितेंद्र आव्हाड; अतुल भातखळकरांचा टोला )

9 बॅंकांवर RBI कडून कारवाईचा बडगा

याआधी नोव्हेंबर महिन्यात आरबीआयने एका मोठ्या बॅंकेचा परवाना रद्द केला होता. याशिवाय विविध बॅंकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने 9 सहकारी बॅंकांना सुमारे 12 लाखांचा दंड ठोठावला होता. बेरहामपूर कोऑपरेटिव्ह अर्बन बॅंक, उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक, महाराष्ट्र आणि संतरामपूर अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक लिमिटेड, गुजरात या बॅंकांचा यामध्ये समावेश होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.