Rashmi Shukla यांची पुन्हा महासंचालकपदी नियुक्ती

44
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला (DGP Rashmi Shukla) यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना त्यांना पदावरून हटवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. विरोधी पक्षातील नेत्यांनीही रश्मी शुक्ला यांच्याविरोधाता निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केली होती. रश्मी शुक्ला यांच्या जागी संजय कुमार (Sanjay Kumar) यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. मात्र आता विधानसभा निवडणूका झाल्यावर महायुती सरकार येणार हे निश्चित झाल्यावर आता पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Rashmi Shukla)
रश्मी शुक्ला, १९८८ च्या बॅचच्या IPS अधिकारी असून, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) आहेत. तसेच रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदावरून तात्पुरती बदली करण्यात आली होती. यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.

(हेही वाचा – Mumbai Terror Attack : राज्यपालांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन)

महायुती आघाडीने विधानसभेच्या २८८ पैकी २३० जागा जिंकल्या. निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या निकालानुसार भाजपाने १३२ जागा जिंकल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, रश्मी शुक्लांच्या पुनर्नियुक्तीवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री राज्य सरकारकडून त्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला. मंगळवारी सकाळी रश्मी शुक्ला पदभार स्वीकारला. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना निवडणूक आयोगाने पदमुक्त केले होते. (Rashmi Shukla)

(हेही वाचा – investment banker salary : गुंतवणूक बँकरला किती असतो पगार?)

दरम्यान, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती राज्य सरकारने केली, तरीही त्यांच्या नियुक्तीपत्रात तात्पुरती नियुक्ती, असा शब्द वापरण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. शनिवारी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शुक्ला यांनी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ex DCM Devendra Fadanvis) यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. सोमवारी रात्री गृह विभागाने शासन आदेश जारी करत त्यांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती करत असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.