मुंबई (Mumbai) – गोवा महामार्ग १२ वर्षे उलटून गेले तरी झाला नाही, त्यामुळे कोकणवासीयांची झालेली कुचंबना कुणालाही पहावत नाही, मात्र आता यातून कोकणवासीयांची सुटका होणार आहे. मुंबई – गोवा महामार्गाचे रडगाणे गात बसण्यापेक्षा वेगळा पर्याय समोर येत आहे, जो याधीपासून अस्तित्वात होता, मात्र त्याचे पुनर्जीवन करून हा प्रवास अवघ्या ६ तासांत करण्याचे ध्येय सरकारने बाळगले आहे.
हा प्रकल्प दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरणार आहे. मुंबई (Mumbai) आणि ठाणे सारख्या शहरांत केबल टॅक्सीसारख्या वाहतुकीच्या नवीन प्रयोगावर सरनाईकांनी विशेष काम केले आहे. ते मुंबई ते गोवा रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरनाईक यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मुंबई महानगर (एमएमआर) प्रदेशात जलवाहतुक सुरु करण्याची घोषणा केली होती. कारण या प्रदेशात एका बाजूला खाडी आहे. दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. येथे १५-२० जेट्टींचे कामही पूर्णत्वास आले आहे. या सफल प्रकल्पांनंतर, मीरा-भाईंदर ते वसई-विरार अशी रो-रो सेवाही सुरू झाली आहे.
(हेही वाचा Waqf Amendment Bill वर भाष्य केल्याने वसीमने शिविगाळ करत निवृत्त लष्कर अधिकाऱ्याला केली मारहाण)
आता सरनाईक म्हणाले आहेत की, मुंबई (Mumbai) ते गोवा रो-रो सेवा लवकरच सुरू करण्यात येईल. जर मुंबई-गोवा जलमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला तर तो गेमचेंजर ठरू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या, मुंबई ते अलिबाग अशी रो-रो सेवा सुरू आहे. ज्यामध्ये बोटीद्वारे वाहनांची वाहतूक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा रो-रो फायदेशीर ठरत आहे. जर मुंबई (Mumbai) आणि गोवा दरम्यान रो-रो फेरी सेवा सुरू झाली तर दोन्ही ठिकाणांना पर्यटनाचा मोठा फायदा होऊ शकतो.
Join Our WhatsApp Community