जालना जिल्ह्यात आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला.लाठीमाराच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.राज्यातील राजकारण पेटलंय.लाठीमारात ५० पेक्षा जास्त जण जखमी झालेत.आमदार रोहित पवार, उद्धव ठाकरे, संभाजीराजे यांनी अंतरगाव सराटी गावात जाऊन आंदोलकांची भेट घेतली, पण हा लाठीमार का करण्यात आला; यासंदर्भात आता पोलीस महानिरीक्षकांनी खुलासा केला आहे.
पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, मंगळवारपासून मनोज जवांगे यांनी उपोषण सुरू केले.त्यांची प्रकृती खालावत होती. तसा वैद्यकीय अधीक्षकांनी अहवाल दिला. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ते तयारही झाले होते; पण काही जनसमुदायाचा विरोध होता. त्यामुळे जनसमुदायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.एसआरपीचे जवान जखमी झाले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.
(हेही वाचा – Prevent Addiction: काश्मिरमधील तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनात वाढ)
जमाव आक्रमक झाल्यानंतर जमावाला शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं. आंदोलकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे बळाचा वापर करावा लागला. हिंसक आरोपींना ताब्यात घेतलं. 21 महिला पोलीस आणि ४३ पुरुष पोलीस असे ६४ पोलीस कर्मचारी जालना सिव्हील रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ४० आरोपींना अटक केली. एसआरपीच्या तीन कंपन्या मिळाल्या आहेत. बाजूच्या ठाण्यातून फोर्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोलिंग सुरू करण्यात आले असल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहितीही पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.
पोलीस जालना लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन केलं आहे की, नागरिकांनी कुठल्याही प्रक्षोभक भाषणाला बळी पडू नये. कायदा आपल्या हाती घेऊ नये. शांततेचं वातावरण करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. यावेळी महिला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.दोन पोलिसांना आयसीयूमध्ये भरती करावे लागले. सात जणांचे सीटीस्कॅन करावे लागले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community