दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक, वाहन विमा महागणार! १ जून पासून कोणते बदल होणार वाचा…

105

१ जून पासून आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असणाऱ्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होणार आहे. पोस्ट बॅंक, एलपीजी सिलिंडर, बॅंकिंग, वाहतूक क्षेत्रातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया…

( हेही वाचा : रेल्वेत तुमची Confirm Seat कोणी बळकावली तर ‘या’ अ‍ॅपवर करा तक्रार! टीसी तात्काळ होईल हजर )

हे बदल होणार…

  • एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींनी काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठला होता. परंतु आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जाणार आहेत. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी झाल्याने गॅसचे दर सुद्धा आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

New Project 44

  • १ जूनपासून वाहनांचा विमा महागणार आहे. यामुळे वाहन चालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. चारचाकी, दुचाकीसह सर्व वाहनांचा विमा महागणार आहे.
  • सोन्याच्या सर्व दागिन्यांवर सरकारने हॉलमार्क बंधनकारक केला आहे. याचा दुसरा टप्पा १ जूनपासून सुरू होणार आहे. यानुसार आता २०, २३, २४ कॅरेट दागिन्यांवर हॉलमार्क करण्यास सुरूवात केली जाणार आहे.

New Project 7 15

  • गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने घेतला आहे. होम लोन व्याजदर ७.०५ टक्के होणार असून याआधी हा व्याजदर ६.६५ टक्के होता.
  • भारतीय पोस्ट पेमेंट्स स्पष्ट केले आहे की, आधारबेस पैसे ट्रान्सफर प्रणालीमध्ये शुल्क लागू करण्यात येणार आहे. हे शुल्क १५ जून पासून आकारले जाणार आहे. दर महिन्याला ३ ट्रान्झेक्शन मोफत असणार आहेत. यानंतर प्रत्येक व्यवहारावर २० रुपये आणि जीएसटी आकारला जाईल.
  • अ‍ॅक्सिस बॅंकमधील सेव्हिंग खात्यामध्ये निम शहरी, ग्रामीण भागात बचत आणि वेतन खात्यांमध्ये सरासरी मासिक बॅलन्स लिमिट १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये किंवा १ लाख रुपये करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.