जगात दर घटकाला नव- नवीन गोष्टींची निर्मिती इंटरनेटच्या साहाय्याने होत आहे. असाच एक नवा प्रयोग भारतात रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम (RTIS) हे यंत्र २९०० ट्रेन एंजिनांमध्ये फिट केले आहे.
हे यंत्र दर ३० सेकंदाला ट्रेनचे लोकेशन, इंजिनचे आरोग्य व प्रभावी ऑपरेशनची माहिती मुख्यालयाला पोचवत राहील. एव्हढेच नव्हे तर रिअल टाईम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम आपल्याला, अचूक स्थान व ट्रेन संबंधित कुठलीही माहिती अगदी काही क्षणात जी.पी.एस. द्वारे देते. त्यामुळे आता प्रवाशांना कुठलीही गैरसोय होणार नाही, हे नक्की.
(हेही वाचा Maharashtra : राज्य आपत्ती निवारणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक निधी)
रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम (RTIS) कडून मिळणारे अपडेट :
• मास्टर कंट्रोलरची स्थिती
• किमी प्रमाणे इंजिनाचा वेग
• जी.पी.एस स्थिती
• तारीख आणि वेळ
• इंजिनातील तेलाचा दाब
Join Our WhatsApp Community