Realty News : मुंबईतील ‘या’ घराची किंमत चक्क ९६ कोटी रुपये

मुंबईतील एक घर तब्बल ९६ कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. घरातील प्रत्येक खोलीतून समुद्र दिसणारं हे घर कुठे आहे, कसं आहे पाहूया…

161
Realty News : मुंबईतील ‘या’ घराची किंमत चक्क ९६ कोटी रुपये
Realty News : मुंबईतील ‘या’ घराची किंमत चक्क ९६ कोटी रुपये

ऋजुता लुकतुके

मध्य मुंबईतील वरळी उपनगरातील एक सदनिका तब्बल ९६ कोटी रुपयांना विकली गेली आहे. ओबेरॉय वेस्ट गृहसंकुलातील ही सदनिका ६,७७९ वर्गफूटांची आहे. आणि वेस्ट ब्रिज कॅपिटल या गुंतवणूक कंपनीचे संस्थापक आणि संचालक समीर चढ्ढा यांनी ती विकत घेतली आहे. इंडेक्सटॅप डॉट कॉम या वेबसाईटवर या व्यवहाराची नोंद झाली आहे. वरळी उपनगरात समुद्रकिनाऱ्यासमोर उभ्या राहिलेल्या ओबेरॉय रियाल्टी कंपनीच्या गृहसंकुलात ही सदनिका ६०व्या मजल्यावर आहे. समीर चढ्ढा यांनी सदनिकेची नोंदणी करताना ३.५९ कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्कही भरल्याची नोंद आहे. नोंदणीची तारीख आहे १८ ऑगस्ट २०२३.

(हेही पहा – Sessions Judge Suspended : तेलंगणामध्ये सत्र न्यायाधीश निलंबित, कारण…)

सदनिकेचा बिल्ट अप एरिया ७,४५९ वर्गफूटांचा आहे, तर कारपेट एरिया ६,७७९ वर्गफूटांचा आहे. ओॲसिस रियाल्टी या कंपनीने हा गृहप्रकल्प विकसित केला आहे. सहाना रियाल्टीचे सुधाकर शेट्टी आणि ओबेरॉय रियाल्टीचे विकी ओबेरॉय यांनी संयुक्तपणे तो उभारला आहे. ३६० वेस्ट या गृहप्रकल्पात सगळी घरं ४ किंवा ५ बेडरुमची श्रीमंती किंवा अतीश्रीमंती घरं आहेत. या प्रकल्पाअंतर्गत दोन मोठे टॉवर इथं उभारण्यात आले आहेत. दुसरा टॉवर रिट्झ-कार्लटन हॉटेलसाठी आहे.

प्रत्येक टॉवरची उंची ३६० मीटर इतकी आहे. तर सर्व घरं पश्चिम दिशाभिमुख आहेत. त्यामुळे गृहप्रकल्पाचं नावच ३६० वेस्ट असे देण्यात आलं आहे. घर सर्व सुखसोयी आणि फर्निचरयुक्त असेल. त्यामुळे रेडी-टू-मूव्ह प्रकारातील ही घरं असतील. मार्च २०२३ मध्ये बजाज कन्सल्टंट्‌स आणि अवनीर कॅपिटल या संस्थांनीही याच इमारतीत ड्युप्लेक्स सदनिका विकत घेतल्या होत्या. त्यांची किंमतही १०० कोटींच्या घरात होती.

मुंबईत अलीकडे मोठ्या आणि आलिशान घरांची खरेदी-विक्री वाढली आहे. अतीश्रीमंत अर्थात हाय नेटवर्थ व्यक्ती (HNIs) या गटात मोडणाऱ्या लोकांचा अशा घरांच्या खरेदीकडे ओढा वाढला आहे. कारण, आयकर कायदा ५४ आणि ५४(एफ) अंतर्गत अशा खरेदीवर उच्च भांडवली नफ्याची सवलत त्यांना मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल २८ आलिशान घरांचे १,२३८ कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले.

डी-मार्ट कंपनीचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २८ आलिशान घरं विकत घेतली. त्यांनी घेतलेली घरंही याच गृहसंकुलाच्या टॉवर बी मधील आहेत. या घरांचं क्षेत्रफळ साधारणपणे ५००० वर्गफूट इतकं होतं. आणि त्यांची किंमत ४०-५० कोटी रुपयांच्या आसपास होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.