इंदौर-दौंड रेल्वेला अपघात! दोन डबे घसरले

मुंबईहून पुण्याला जात असलेल्या इंदौर-दौंड एक्स्प्रेसला सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामुळे मुंबई-पुणे रल्वे वाहतुकीला फटका बसला असून, प्रवाशांचा खोळंबा होत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

असा झाला अपघात

इंदौरहून मुंबई मार्गे दौंड येथे जाणा-या गाडी क्रमांक 02944 इंदौर-दौंड विशेष एक्स्प्रेसचे दोन डबे सोमवारी सकाळी लोणावळा येथे घसरले. लोणावळा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही एक्स्प्रेस थांबताना अचानक तिच्या मागच्या बाजूचा दुसरा आणि तिसरा असे दोन डबे रुळावरुन घसरले. सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी ही घटना घडली. गाडी थांबत असल्याने तिचा वेग कमी होता, त्यामुळे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अपघात टळला आहे.

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या अपघातामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लवकरच हे डबे रुळावर आणण्यात येणार असून, वाहतूक पूर्वपदावर आणली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी कुठल्याही प्रकारे घाबरुन जाू नये, असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here