Solapur News : भुईकोट किल्ल्याच्या हत्ती दरवाजाची पुर्नबांधणी, पुरातत्त्व विभागाने घेतली दखल

108
Solapur News : भुईकोट किल्ल्याच्या हत्ती दरवाजाची पुर्नबांधणी, पुरातत्त्व विभागाने घेतली दखल
Solapur News : भुईकोट किल्ल्याच्या हत्ती दरवाजाची पुर्नबांधणी, पुरातत्त्व विभागाने घेतली दखल

सोलापुरातील भुईकोट किल्ल्यातील हत्ती दरवाजाच्या पुर्नबांधणीनंतर दुरुस्ती पर्व वेगात सुरू आहे. किल्ल्याच्या खंदकातील नागबावडी विहीर दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे.

बहामनी सरदार मुहमद गवान यांनी १४६० च्या आसपास भुईकोट किल्ल्याची बांधणी केली. या किल्ल्याच्या आतील भागात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर आहे. या मंदिराची पुष्करणी म्हणजेच नागबावडी विहीर होय. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस येथे हलविण्यात आल्यानंतर ही पुष्करणी किल्ल्याच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरली जाते. आजही या विहिरीच्या पाण्यावर किल्ल्याच्या २२ एकर जागेतील विविध झाडांना पाणीपुरवठा केला जातो. मागील काही वर्षात या नागबावडीच्या भिंतीत झुडपे उगवल्याने पडझड झाली होती. या पाण्याचा अनेक दिवस उपसा न झाल्याने पाण्यावर शेवाळ जमा झाले होते.

(हेही वाचा – Maratha Reservation : …तर आरक्षणाची गरज भासणार नाही – बच्चू कडू )

कचरा, दलदल यामुळे दुर्लक्षित असलेल्या नागबावडी विहीरीकडे कुणाचेही लक्ष नव्हते.दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. किल्ल्याच्या हत्ती दरवाजाला पूर्व वैभव प्राप्त झाल्यानंतर आता नागबावडीलादेखील पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. त्यामुळे आता लवकरच सावरकर मैदानाकडील बाजूने हत्ती दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.