New Company Registration : ऑगस्ट महिन्यात विक्रमी १५,३०० नवीन कंपन्यांची नोंदणी

यावर्षी पहिल्या पाच महिन्यात ७९,३०० पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झाली

120
New Company Registration : ऑगस्ट महिन्यात विक्रमी १५,३०० नवीन कंपन्यांची नोंदणी
New Company Registration : ऑगस्ट महिन्यात विक्रमी १५,३०० नवीन कंपन्यांची नोंदणी
  • ऋजुता लुकतुके

नवीन आर्थिक वर्षातील (New Company Registration) पहिल्या पाच महिन्यांत तब्बल ७९,००० कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यातही ऑगस्ट महिन्याचा आकडा विक्रमी आहे. त्यामुळे देशात सध्या उद्योजकतेचे वारे वाहताना दिसत आहेत

नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशात १५,३०० नवीन कंपन्यांची नोंदणी झाली, तर ४,६०० अशा कंपन्यांची नोंदणी झाली ज्या भागिदारीत सुरू झाल्या आहेत. ऑगस्ट मधील नोंदणी ही विक्रमी आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे. आणि त्यातून दोन सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीच्या तुलनेत आताचे आकडे ६ टक्के जास्त आहेत. हा एक सकारात्मक बदल. आणि दुसरं म्हणजे कंपनीच्या नोंदणीसाठी केंद्रीय प्रक्रिया तुलनेनं सोपी झाल्याचा अभिप्रायही सरकारला मिळाला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑगस्ट महिन्यात १४,४०० कंपन्यांची नोंदणी झाली होती. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात ७८,११८ कंपन्यांची नोंदणी झाली होती.

(हेही वाचा – MLAs Disqualification : आमदार अपात्रतेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येणार आमने-सामने ?)

हा आकडाही गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. यावर्षी पहिल्या पाच महिन्यात ७९,३०० पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झाली आहे. कंपनीच्या नोंदणीची बरीचशी प्रक्रिया सध्या ऑनलाईन होते. आणि ती सुरक्षितपणे व्हावी यासाठी सरकारने पोर्टलवर टू-पॉइंट-ऑथेंटिकेशन ही नवीन प्रणाली बसवली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात ती कार्यान्वित झाली.

या प्रणालीमुळे सुरुवातीला लोकांना नोंदणीसाठी अडचणी येत होत्या. आणि काही काळ नोंदणी रखडलेलीही होती. पण, तरीही नोंदणीची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढलेलीच आहे, ही समाधानाची गोष्ट मानली जात आहे.

या बातमीत आणखी एक सकारात्मक चित्र दडलेलं आहे. कंपन्यांची नोंदणी वाढणं हा देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी सकारात्मक चित्र उभं करतो. म्हणजेच, नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार तयार असल्याचा संदेश यातून मिळतो. कंपन्यांच्या नोंदणीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू व्हायला सहा महिन्यांचा अवधी लागू शकतो. पण, तोपर्यंत निदान सुरुवातीची गुंतवणूक होत असल्यामुळे हे चित्र सकारात्मकच मानलं जात आहे. शिवाय वाणिज्य मंत्रालयाची आणखी एक आकडेवारी असं सांगते की, देशात या घडीला १.८ दशलक्ष उद्योग हे कार्यरत आहेत. सलग दोन वर्ष वार्षिक ताळेबंद सादर न केलेल्या कंपन्या सरकारी आकडेवारीतून रद्द केल्या जातात. अशावेळी १.७ दशलक्ष कंपन्या कार्यरत असणं हा आर्थिक आरोग्यासाठीचा चांगला निकष मानला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.