राज्यात ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचा रॅकोर्ड, पुण्यात रुग्ण वाढीचा विस्फोट

103

चाचण्यांच्या कीट अभावी ओमायक्रॉनच्या केसेस फारशा दिसत नसताना शुक्रवारी राज्यात ऑमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचा पहिल्यांदाच रॅकोर्ड झाला. एका दिवसांत ओमायक्रॉनचे २३८ नवे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने २३८ ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचे निदान केले. एकट्या पुण्यात १९७ केसेस आढळल्याने पुण्यात ओमायक्रॉनचा कहर दिसून आला. पुण्याखालोखाल पिंपरी-चिंचवडमध्ये ३२, पुण्यातील ग्रामीण भागांत आणि नवी मुंबईत प्रत्येक तीन नवे रुग्ण आढळले. तर मुंबईत दोन रुग्ण दिसले. अकोल्यातही एक रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

(हेही वाचा पुण्याचा बिबट्या झाला अंबरनाथकर)

राज्यात कुठेकुठे वाढतात ओमायक्रॉनचे रुग्ण

आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे १ हजार ६०५ रुग्ण दिसून आले. सर्वाधिक नोंद मुंबईत ६२९, तर पुण्यात ५२६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही आजतागायत १०७ ओमायक्रॉनच्या रुग्णाची नोंद झाली आहे.

आता केवळ ७४६ सक्रीय ओमायक्रॉनचे रुग्ण

१ हजार ६०५ रुग्णांपैकी ८५९ रुग्णांना आतापर्यंत राज्यातील विविध भागांतून उपचार केल्यानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. आता केवळ ७४६ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.