Diwali : नवरात्री ते दिवाळी काळात १२ हजार ६०० घरांची विक्रमी विक्री

160

नवरात्रीपासून दिवाळी (Diwali) भाऊबीजेपर्यंत म्हणजे १५ ॲाक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत १२ हजार ६०० घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात दहा हजार घरांची विक्री झाली होती. हा टप्पा यंदाच्या घरविक्रीने पार केला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत १२५७ कोटी रुपयांची भर पडली.

मुंबईत झालेल्या घर विक्रीबाबत नाईट फ्रॅंक कंपनीने तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षांतील २६ ॲाक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत नऊ हजार ६५९ घरांची विक्री नोंदली गेली होती. यंदा १५ ॲाक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात १२ हजार ६०२ घर विक्रीची नोंद झाली आहे. प्रत्येक दिवशी सरासरी ४०७ घरे विकली गेल्याचे या आकडेवारीवरून दिसते. गेल्या वर्षाच्या तुलनेत २९४३ घरांची विक्री अधिक झाल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा Australia in Final : दक्षिण आफ्रिका पुन्हा चोक; ३ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत भारतासोबत)

यंकोट्यवधी रुपयांची घरे विकत घेणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मुंबई महानगर प्रदेशातील आलिशान घरांच्या विक्रीत यंदा ७४ टक्के वाढ झाली आहे. मुंबईत अशा प्रकारची ३६ हजार १३० तर पुण्यात ६ हजार ८५० घरांची विक्री झाली आहे. मुंबईत घरविक्रीचा सध्या वाढलेला आकडा हा प्रामुख्याने एक ते दोन कोटींपर्यंतच्या घरासाठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.