समृद्धी महामार्गावर विक्रमी टोलवसुली! महिन्याभरात साडेतीन लाखांहून अधिक वाहनांनी केला प्रवास

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी ते नागपूर सुसाट प्रवास सुरू झाला. लोकार्पण झाल्यानंतर या महामार्गावर विक्रमी टोलवसुली करण्यात आली आहे. आतापर्यंत 21 कोटी रुपयांच्या जवळपास टोलवसुली झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या मार्गाचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत नागपूर समृद्धी महामार्गावर महिन्याभरात 3 लाख 55 हजारपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रातल्या १६ बोली आणि ३५ संघांच्या सहभागाने रंगलेली बोलीभाषा एकांकिका स्पर्धा )

नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील सुसाट प्रवासासाठी वाहनचालकांना टोल द्यावा लागतो. महिन्याभरात समृद्धी महामार्गावर ३ लाख ५५ हजारपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावर 21 कोटी 3 लाख रुपये टोल वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुसाट प्रवासासाठी किती टोल?

सध्या फक्त नागपूर ते शिर्डी एवढाच रस्ता झाला असून शिर्डी ते मुंबईचे काम अद्याप सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून 1 मिनिटात 2 किलोमीटर अंतर सहजपणे पार करता येईल. औरंगाबादहून शिर्डीला एक तासात जाता येईल. एक किलोमीटर अंतरासाठी 1.73 रुपये असा टोल असेल.

आजवर देशात जे ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेस-वे झाले त्यापैकी राज्यातील समृद्धी महामार्ग सर्वात मोठा आहे. सध्या आग्रा-लखनऊ हा 301 किलोमीटर, यमुना एक्स्प्रेस-वे 165 किलोमीटर, हैदराबाद (ओआरआर) एक्स्प्रेस-वे 150 किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गाची मुंबई ते नागपूरपर्यंतची लांबी 701 किलोमीटर आहे. शिवाय 55 हजार कोटी रुपये हा खर्चदेखील इतर एक्स्प्रेस-वेच्या तुलनेने सर्वाधिक आहे. महामार्गासाठी संपादित एकूण 400 फूट रुंद जागेमध्ये वाहनांना धावण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 3 लेन. तब्बल 50 फूट रुंदीचे दुभाजक. रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटरच्या लांबीमध्ये एक लाख भारतीय वंशाचे वृक्ष लावले जाणार आहेत. सध्या मुंबई ते नागपूर 812 किमीसाठी कारने 15 तास, 51 लिटर डिझेल अन् 450 रुपये टोल लागतो. समृद्धी महामार्गावरून हे अंतर 701 किमी असेल. प्रवासात 3 हॉल्ट गृहीत धरून 7 ते 8 तास लागतील. अंदाजे 39 लिटर डिझेल व 1212 रुपये टोल लागेल. वेळ-इंधनही वाचेल, प्रदूषणही घटेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here