सध्या दिवाळीनिमित्ताने खरेदी-विक्रीला जोर आला आहे. मात्र रोख रकमेच्या व्यवहारच्या तुलनेत UPI व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत, ऑक्टोबर महिन्यामध्ये UPI द्वारे 1,658 कोटींचे व्यवहार झाले. या काळात 2,350 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत व्यवहारांची संख्या 45% वाढली आहे. UPI ऑक्टोबर 2023 मध्ये, UPI द्वारे 1,141 कोटी व्यवहार केले गेले आणि त्याद्वारे 17.16 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. एका वर्षात व्यवहारांचे हे प्रमाण 37% वाढले आहे. ऑक्टोबर 2024 मधील दैनंदिन सरासरी व्यवहाराबाबत बोलायचे झाले तर ते 53 कोटी 50 लाख होते आणि दररोज सरासरी 75,801 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित होते.
सप्टेंबरच्या तुलनेत UPI व्यवहारांमध्ये 10.23% वाढ झाली आहे त्याच वेळी मागील महिन्याच्या (सप्टेंबर 2024) तुलनेत व्यवहारांच्या संख्येत 10.23% वाढ झाली आहे. तर हस्तांतरित केलेल्या रकमेत 13.85% वाढ झाली आहे.सप्टेंबर 2024 मध्ये, UPI द्वारे 1,504 कोटी व्यवहार झाले आणि त्यातून 20.64 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या UPI चे नियमन करणाऱ्या संस्थेने आज (1 नोव्हेंबर) व्यवहाराची आकडेवारी जाहीर केली.
Join Our WhatsApp Community