Bombay High Court मध्ये सुरू असलेल्या सुनावणीचे रेकॉर्डिंग करणे एका तरुणाला पडले महागात; अशी केली कारवाई 

71

Bombay High Court मध्ये सुनावणी रेकॉर्ड करणे एका तरुणाला महागात पडले आहे. यामुळे तरुणाला १ लाख रुपये दंड भरावा लागेल. गेल्या गुरुवारी (२० फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाने ही कारवाई केली. न्यायालयात सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादाच्या सुनावणी दरम्यान, साजिद पटेल (Sajid Patel) नावाच्या एका व्यक्तीला न्यायालयीन कामकाजा दरम्यान ऑडिओ रेकॉर्डिंग करताना पकडण्यात आले. (Bombay High Court)

१ लाख रुपयांचा लावला दंड
अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयाने ₹१००००० चा दंड ठोठावला आहे. वास्तविक, न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खटा यांच्या खंडपीठासमोर मालमत्ता वादाच्या खटल्याची सुनावणी सुरू होती, त्यादरम्यान न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी साजिद पटेल यांना सुनावणीदरम्यान ऑडिओ रेकॉर्डिंग (Bombay High Court audio recording case) करताना पकडले.

(हेही वाचा – Employment Fraud: सीमाशुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४ जणांना घातला लाखोंचा गंडा)

चौकशीदरम्यान हे स्पष्ट झाले की पटेलला ऑडिओ रेकॉर्ड (Audio record) करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. आरोपीचा फोन न्यायालयाने जप्त केला. आरोपीने न्यायालयात विनंती केली की ही त्याची पहिली चूक आहे आणि म्हणून त्याला सौम्यतेने वागवले पाहिजे. आरोपीने न्यायालयाला सांगितले की, या चुकीबद्दल तो पुढील तीन दिवसांत उच्च न्यायालय कर्मचारी वैद्यकीय निधीला १ लाख रुपये देईल.

कोणत्याही न्यायालयाची सुनावणी अत्यंत गोपनीय असते, जर ती अशा प्रकारे रेकॉर्ड केली गेली तर कारवाई केली जाऊ शकते. याच कारणामुळे या व्यक्तीने रेकॉर्डिंग केल्यानंतर न्यायालयाने त्याचा फोन जप्त केला तसेच १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने केलेल्या या कारवाईमुळे लोकांना असा संदेशही मिळेल की त्यांनी न्यायालयात शिस्तबद्धपणे वागावे आणि कायद्याचे पालन करावे. बऱ्याच वेळा, हातात मोबाईल असल्याने, लोक कुठे आहेत आणि कसे वागावे हे ओळखू शकत नाहीत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.