माहिमने कोरोनाला केले शून्यावर बाद

मागील चार महिन्यांपासून माहिममधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, रविवारी या रुग्णांचा आकडा शून्यावर आला आहे. रविवारी माहिम परिसरात एकही रुग्ण आढळून आला नसून, संपूर्ण जी-उत्तर विभागात केवळ १२ रुग्ण आढळून आले.

फेब्रुवारी नंतर पहिल्यांदाच शून्यावर 

दादर, माहिम आणि धारावी जी-उत्तर विभागात रविवारी एकूण १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये दादरमध्ये १० रुग्ण तर धारावीमध्ये २ रुग्ण आढळून आले. त्याचप्रमाणे माहिममध्ये एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. २ फेब्रुवारी २०२१ला माहिममध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. त्यानंतर प्रथमच रविवारी रुग्णांचा आकडा शून्यावर आला आहे.

(हेही वाचाः माहिम,दादर आणि धारावीतली रुग्णसंख्या येतेय आटोक्यात!)

अशी आहे रुग्ण संख्या

सध्या या तिन्ही भागांमध्ये ३१२ सक्रीय रुग्ण आहेत. माहिममध्ये एकही रुग्ण रविवारी आढळून आला नसला, तरी या भागात सध्या १३९ सक्रीय रुग्ण आहेत. तर धारावीमध्ये १३ आणि दादरमध्ये १६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतही संख्या होत आहे कमी

मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात ७३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शनिवारपर्यंत १५ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सरू होते. शनिवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला.

(हेही वाचाः रुग्ण संख्या घटली, दिवसभरात ७३३ रुग्ण!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here