गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद पाचशेच्यावर दिसून येत आहे. परिणामी, रुग्ण बरे होण्याच्या राज्यभरातील दरात आता थोडी घट दिसून आली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९८.०९ टक्क्यांवर आला आहे. गेल्या आठवड्यात हा दर ९८.१० टक्क्यांपर्यंत होता. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सातत्याने मोठ्या संख्येने आता रुग्ण वाढत आहेत.
(हेही वाचाः बापरे! राज्यात कोरोनाचे दोन नवे विषाणू)
राज्यात तीन हजार सक्रीय रुग्ण
रविवारी सोलापूरात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सलग चौथ्या दिवशी ५५० कोरोनाचे नवे रुग्ण राज्यात सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता २ हजार ७० वर पोहोचली आहे. पुण्यात ३३३, तर ठाण्यात ३५४ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दर दिवशी येणा-या नव्या कोरोनाच्या नोंदीच्या तुलनेत कोरोना उपचारांतून बरे होणा-या रुग्णांची संख्या तुलनेने कमी नोंदवली जात आहे. राज्यात सध्या २ हजार ९९७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community