राज्याचा रिकव्हरी रेट(रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) भारताच्या सरासरी रिकव्हरी रेटपेक्षा जास्त असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट २७ टक्क्यांवरुन २२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे ५ टक्क्यांची ही घट दिसत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. आपण राज्यात रोज २.५ लाख ते २.८ लाख चाचण्या करत असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण यावर माध्यमांशी संवाद साधला.
राज्य लवकरच स्वयंपूर्ण होणार
महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असून, ऑक्सिजन स्टोअरेज टँक, बफर स्टॉक निर्माण करणे याची व्यवस्था सुरू आहे. तिसरी लाट येण्याची वाट न पाहता ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य लवकरच स्वयंपूर्ण होईल, अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली.
(हेही वाचाः सरकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३५० कोटी रुपयांचे सहाय्य)
राज्यात 24 जिल्हयांमध्ये कोरोनाचा संसर्ग
जरी राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटत असली, तरी 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच या 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना कमी करण्याचे टार्गेट असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
लसीकरणावर काय म्हणाले टोपे
राज्यात 45 आणि त्यावरील लोकांसाठी काल महाराष्ट्रात 25 हजार लसी उपलब्ध होत्या. आता 9 लाख डोस अर्ध्या तासापूर्वी आले आहेत. हे कोविशिल्डचे डोस आहेत. ते आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पाठवण्यात येणार आहेत. 45 वर्षाच्या वरील 1 कोटी 65 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. हे प्रमाण एकूण संख्येच्या 45 टक्के आहे. उर्वरित 50 टक्के नागरिकांना लस देणं बाकी असल्याचे टोपे म्हणाले. यावेळी राजेश टोपे यांनी रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट दिल्याशिवाय लसीकरणासाठी गर्दी करू नये. मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री तसेच सर्व मंत्र्यांचे मत हे एका चेकमध्ये लसी खरेदी करण्याचे आहे. मात्र, सध्या लसी उपलब्ध होत नाहीत. सध्या स्पुतनिक लससुद्धा आलेली आहे. त्याविषयी दर ठरवणे बाकी आहे. त्यानंतर ही लस सुद्धा मिळेल. पुण्याचे अदर पुनावाला यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहे. ते विदेशातून परत आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. ग्लोबल टेंडरमधून अनेक देशांनी प्रतिसाद दिल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community