केंद्र सरकारकडून १० लाख पदांसाठी मेगाभरती! जाणून घ्या कोणत्या विभागात किती पदं रिक्त

201

देशातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या दीड वर्षांमध्ये देशातील 10 लाख सरकारी पदे भरण्यात येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात एक ट्वीटही करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये पुढील काही महिन्यांत ही मेगाभरती केली जाणार आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही पोस्ट ऑफिस, डिफेन्स, रेल्वे, आणि महसूल विभागांमध्ये रिक्त आहेत.

लवकरच होणार मेगाभरती 

  • रेल्वे – २.३ लाख पदं रिक्त
  • नागरी संरक्षण दल – २.५ लाख रिक्त जागा
  • भारतीय पोस्ट ऑफिस – ९० हजार जागा
  • महसूल विभाग – ७४ हजार जागा
  • गृह विभाग – १.३ लाख

( हेही वाचा : LPG Gas Connection : १६ जून पासून घरगुती गॅस कनेक्शन महागणार! मोजावे लागणार एवढे रुपये)

सरकारच्या सर्व विभागांमध्ये मिळून ८.७२ लाख पदं रिक्त असल्याची माहिती सरकारने १ मार्च २०२२ मध्ये दिली होते. यातील सर्वाधिक जागा या ‘क’ गटातील आहेत. ‘क’ गटात येणारी जवळपास ७.५६ पदं रिक्त आहेत. तर ‘ब’ गटातील ९४ हजार ८४२ जागा आणि ‘अ’ गटातील रिक्त जागांची संख्या २१ हजार २५५ एवढी आहे.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत सर्व विभागांमधील पदांचा आढावा घेतला होता. त्यानुसार, Human Resources in all departments and ministries या खात्याला 2023 पर्यंत 10 लाख पदे भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.