MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १०८५ जागांसाठी भरती

135

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या प्रत्येक गाड्यांवर वाहन ट्रॅकिंग सिस्टिमची नजर!)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब करिता एकूण १०८५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटती तारीख १७ जून २०२२ आहे.

अटी व नियम

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा
  • पदाचे नाव – सहायक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक
  • पद संख्या – १०८५ जागा
  • अर्ज शुल्कअमागास – ५४४ रुपये, मागासवर्गीय – ३४४ रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ३ जून २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०२२
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र – दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणित प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट साइझ फोटो
  • केंद्र – अमरावती, औरंंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे

New Project 8 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.