सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात २ लाख ७५ हजार जागांसाठी मेगाभरती

156

कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी निर्माण होणार आहे. कारण महाविकास आघाडीने मेगाभरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात लवकरच २ लाख ७५ हजार जागांसाठी मेगाभरती होणार आहे. राज्यात ४२ विभागात तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : MPSC भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस! पूर्व परीक्षेची तारीख जाहीर)

कोणत्या विभागात किती जागा रिक्त

  • गृहविभाग- ४९ हजार ८५१
  • सार्वजनिक आरोग्य विभाग – २३ हजार ८२२
  • जलसंपदा विभाग – २१ हजार ४८९
  • महसूल व वन विभाग – १३ हजार ५५७
  • वैद्यकीय शिक्षण विभाग – १३ हजार ४३२
  • सार्वजनिक बांधकाम विभाग – ८ हजार १२
  • आदिवासी विभाग – ६ हजार ९०७
  • सामाजिक न्याय विभाग – ३ हजार ८२१

या जागांवर लवकरच भरती निघणार आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मागील पाच-सहा वर्षांत रिक्त जागांची भरती होऊ शकली नाही. सध्या सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त झाल्या आहेत.

रिक्त जागा वाढण्याची कारण

दरवर्षीची सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती यामुळे बालविकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, पशुसंवर्धन या विभागांमधील रिक्त जागा वाढल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.