दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी! पुणे विभागात ७५०० रिक्त पदांसाठी भरती

151

पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये औद्योगिक आणि इतर सेवा क्षेत्रात विविध प्रकारची सुमारे साडेसात हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने ४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! घर बांधण्यासाठी मिळणार तब्बल २५ लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना )

महारोजगार मेळाव्याचे आयोजन

या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील ४० हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे साडेसात हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील. या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.