IBPS बॅंकेत 8106 रिक्त जागांसाठी भरती सुरू!

तुम्ही जर बॅंकेत काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ८ हजार पेक्षा जास्त जागांसाठी या बॅंकेत पदभरती केली जाणार आहे. यासाठी इन्टिट्यूट ऑफ बॅंकिंग कार्मिक सिलेक्शन(IBPS)कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IBPS अंतर्गत गट ‘अ’ अधिकारी आणि गट ‘ब’ कार्यालय सहायक पदांच्या एकूण ८ हजार १०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

( हेही वाचा : मासेमारी बंदीचा परिणाम; राज्यात मासळीचा तुटवडा, दर वधारले!)

नियम व अटी 

 • पदाचे नाव – गट A अधिकारी ( स्केल- I, II आणि III) आणि गट B कार्यालय सहायक
 • पद संख्या – ८ हजार १०६ जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क – SC/ST/ PWBD उमेदवारांसाठी १७५ रुपये, इतर सर्वांसाठी – ८५० रुपये
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – ७ जून २०२२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जून २०२२
 • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

वयोमर्यादा

 • अधिकारी स्केल III ( वरिष्ठ व्यवस्थापक ) २१ ते ४० वर्षे
 • ऑफिसर स्केल – II (व्यवस्थापक) २१ ते ३२ वर्षे
 • ऑफिसर स्केल – I ( सहायक व्यवस्थापक ) १८ ते ३० वर्षे
 • ऑफिस असिस्टंट – १८ ते २८ वर्ष
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4483
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2676
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 12
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 6
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 10
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 18
7 ऑफिसर स्केल-II (CA) 19
8 ऑफिसर स्केल-II (IT) 57
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 745
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 80
Total 8106

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here