कोरोना काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. या नोकरी गमावलेल्या लोकांनी कोरोना साथीनंतर नोकरी शोधण्याची धडपड सुरु केली आहे. तर बऱ्याचदा फ्रेशर्सला सुद्धा अनुभव नसल्यामुळे नोकऱ्या नाकारल्या जातात अशा सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. एसटी महामंडळाच्या पुणे विभागात शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे आहे.
( हेही वाचा : फक्त २९ रुपयांमध्ये करा एसी लोकलने प्रवास! पहा नवे दरपत्रक… )
या वेबसाईटवर करा अर्ज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुणे विभागात शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीची संपूर्ण माहिती www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर या अर्जाची प्रत नियंत्रक रा.प.विभागीय कार्यालय शंकरशेठ रस्ता या पत्त्यावर उपस्थित राहून १० ते ५.३० या कार्यालयीन वेळेत सादर करावी.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- अर्ज – ऑनलाइन
- अधिकृत वेबसाइट – www.apprenticeship.gov.in
- पत्ता : नियंत्रक रा.प.विभागीय कार्यालय शंकरशेठ रस्ता
- शेवटची तारीख – ०८ मे २०२२