कोकण रेल्वेत नोकरीची संधी! परीक्षेविना होणार निवड; १ लाखापर्यंत मिळणार पगार

कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर आणि डेप्युटी एफ ए अँड सीएओचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

( हेही वाचा : बेस्टचे बंद केलेले बसमार्ग पुन्हा सुरु होणार?)

नियम व अटी

  • वयोमर्यादा – ४५ वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख व मुलाखतीची तारीख – १७ ऑगस्ट २०२२
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, ६ वा मजला, प्लॉट क्रमांक ६, सेक्टर ११, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र
  • अधिकृत वेबसाइट – konkanrailway.com
  • पद संख्या – २
  • ई-मेल पत्ता – [email protected]

निवड झालेल्या उमेदवाराला कॉर्पोरेट ऑफिस बेलापूर, नवी मुंबई येथे नोकरी लागणार आहे. या पदासाठी ४५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून निवडलेल्या उमेदवाराला दरमहा १ लाख ५ हजार ५९२ रुपये इतका पगार दिला जाणार आहे. तर, डेप्युटी एफ ए अँड सीएओच्या पदासाठी उमेदवाराला दरमहा ७८ हजार ८०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. तसेच ४३ हजार ६५७ एवढा भत्ता दिला जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here