रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना होणार निवड, असा करा अर्ज

155

कोकण रेल्वे अंतर्गत उपमहाव्यवस्थापक पदाची जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे.

( हेही वाचा : रावसाहेब दानवेंनी घेतली राजेश टोपे यांची गुप्त भेट; तर्कवितर्कांना उधाण)

अटी व नियम काय आहेत ?

  • पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक
  • वयोमर्यादा – ६४ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येईल
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्जासाठीच्या सविस्तर सूचना konkanrailway.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

10 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी 

रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर अशी अनेक ट्रेडमध्ये ३ हजार हून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ३० सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली असून पात्र उमेदवार २९ ऑक्टोबर किंवा यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. केवळ ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत.

या पदांसाठी संधी

  • हावडा डिव्हिजन – ६५९ पदे
  • लिलुआ ऑफिस – ६१२ पदे
  • सियालदह डिव्हिजन – ४४० पदे
  • कांचरापाडा ऑफिस – १८७ पदे
  • मालदा डिव्हिजन – १३८ पदे
  • आसनसोल ऑफिस – ४१२ पदे
  • जमालपूर ऑफिस – ६६७ पदे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.